‘माझी बोली माझी कथा’ या कथा संग्रहात राम निकम यांच्या ग्रामीण बोलीतील  कथेचा समावेश

मुंबई,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  प्रत्येक ​ प्रांतात बोली या विषयी अभ्यास हो​णे ​ गरजेचे आहे.आपल्या मात्र भाषेचा सार्थ अभिमान आप​ण ​ बाळगायला हवा​ ​असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोनिका ठक्कर यांनी संकलित व संपादित केलेल्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.त्यावेळी ते बोलत होते.या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी डाॅ मोनिका ठक्कार यांचे कौतुक केले.

राम निकम

या पुस्तकात ​‘माझी बोली माझी कथा’​ या ५७ बोली भाषेतील कथा संग्रहात राम निकम यांच्या अस्सल ग्रामीण बोलि भाषेतील ‘गरवार’ या कथेचा समा​वेश ​ करण्यात ​आला​.बोली विषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ​ग्रंथाच्या ​ रूपाने झाला आहे  ​मा​झी ​ ​बो​ली ​ माझी कथा​​ असे या ग्रंथाचे नाव असुन या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे, या दृष्टीने सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा समाविष्ट केल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डाॅ.मोनिका ठक्कर यांनी आजवर संशेधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या बारा ग्रंथांचा ​अनुभव ​ घेऊन महाराष्ट्रात विविध बोलितील सदर अभ्यास पूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि ​समन्वयाची ​ भुमिका सांभाळ​ली ​ आहे.