एकनाथ शिंदेनी घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण

मुंबई,२६ मार्च  /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या इशाऱ्यानंतर शासनाने तातडीने कारवाई करत माहिम येथील समुद्रातील तसेच सांगलीतील अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज यांचे कौतुकही केले होते. या घटनांमुळे सध्याच्या भेटीला राजकीय समीकरणाचा रंग प्राप्त झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.