महिला दिन विशेष:एक ​कर्तृत्ववान महिला अधिकारी आयपीएस महक स्वामी

जफर ए. खान ​

जच्या बदलत्या काळात पोलिसांच्या क्षेत्रात गुन्हेगारांशी दोन हात करत कायदा व सुव्यवस्था राखणे हे  दिवसेंदिवस किचकट होत चालले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या या दुनियेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर आता मोठी जबाबदारी आहे,यातच महिला अधिकारी म्हटले की अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते परंतू या सर्व आव्हानांना चोख प्रत्युत्तर देत वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या “धाकड महिला अधिकारी” म्हणून अल्प काळात वैजापूर उपविभागात आपली ओळख बनवणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी रुजू होण्याच्या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत अवैध धंद्यांना आळा घालत, चोऱ्या, दरोडे यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या वैजापूर उपविभागाला जेव्हा इंवेस्टीगेशन मध्ये गोल्ड मेडल मिळालेल्या अधिकारी मिळाल्या तेव्हा या भागात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास करून उलगडा लावत त्यांनी गुन्हेगारांना चाप लावला आहे. पोलिसांच्या या कठीण क्षेत्रात महिला देखील कमी नाही याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

             मूळच्या कुरक्षेत्र हरियाणा येथील रहिवासी असलेल्या महक स्वामी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांना भारतीय प्रशासकीयसेवेत काम करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीतून त्यांनी अभियंता पदाची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास केला. आईवडीलांच्या मार्गदर्शन आणि पाठबळावर त्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आव्हानात्मक अशा पोलिस दलात सक्रिय होण्याचा मार्ग निवडला. महिला पोलिसांना कणखरकरण्यासाठी त्यांनी पुढाकाराची भूमिका घेतली आहे. वैजापूर, शिऊर, वीरगाव या तीन पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना फिल्ड वर्कवर सक्रिय करण्यासोबतच त्यांना स्वरक्षणासाठी ज्युडो कराटेचे विशेष प्रशिक्षण त्यांनी सुरू केले. पोलिस दलात महिला काम करण्यासाठी अधिक उत्सुक नसतात, परंतु महक स्वामी यांनी या क्षेत्राला काम करण्यासाठी महिला कमकुवत नाही. पुर्ण क्षमतेने महिला अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करू शकतात, त्यांनी केलेल्या विविध कारवाईतून दिसत आहे.