रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार ,वकिलांची माहिती 

मुंबई,
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाला दररोज नवे वळण येत आहे. आता रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचे तिचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ची टीम आज सकाळी रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाली होती, यावेळी तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात रिया सकाळी ११ वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयासाठी रवाना झाली. त्यानंतर ॲड. मानेशिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जर हे प्रकरण जादूटोण्याचे असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणे हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला तयार आहे. निर्दोष असल्याने तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *