फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण जीएसटी पोटी ₹ 1.49 लाख कोटी महसूल झाला जमा

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा यंदा 12% जास्त

सलग 12 महिने 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मासिक जीएसटी महसूल जमा

नवी दिल्ली,​१ मार्च / प्रतिनिधी:- फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी (GST) पोटी जमा झालेला  एकत्रित महसूल ₹1,49,577 कोटी इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) ₹27,662 कोटी, एसजीएसटी (SGST) ₹34,915 कोटी, आयजीएसटी (IGST) ₹75,069 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या  ₹35,689 कोटींसह) आणि उपकर ₹11,931 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹792 कोटींसह) आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी  ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि  ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर  केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या  महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची  AG प्रमाणित आकडेवारी  पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 12% जास्त आहे, जो  रु. 1,33,026 कोटी इतका होता. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात उपकारा पोटी ₹11,931 कोटी इतका आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला. साधारणपणे, फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना असल्याने, तुलनेने कमी महसूल जमा होतो.