नांदेड जिल्ह्यात 29 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड दि. 24 :- गुरुवार 24 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 917 अहवालापैकी 877 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 211 एवढी झाली असून यातील 20 हजार 148 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 298 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 23 डिसेंबर रोजी शिवाजी चौक सिडको येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर मगनपुरा नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 568 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 5 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 74 हजार 422एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 49 हजार 121एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 211एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 148एकुण मृत्यू संख्या-568उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंकआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-470रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-298आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.