वैजापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

वैजापुरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन

वैजापूर ,१९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.19) वैजापूर येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धभिषेक करून अभिवादन करण्यात आले.

आ. रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती महक स्वामी, तालुका काँग्रेसचेवअध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, भाजप तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, हिंदवी स्वराज प्रतिष्ठानचे विशाल संचेती, पारस घाटे, सुनील बोडखे यांनी दुग्धाभिषेक केला. सूत्र संचलन व आभार धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले. 

याप्रसंगी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे शैलेश चव्हाण, महेश बुणगे, तेजस जगताप, सोमू सोमवंशी, प्रवीण कोतकर, शेखर मगर, श्रीराम गायकवाड, सचिन दाढे, वल्लभ सोनवणे, रोहित गुळस्कर, प्रमोद कोतकर, नितीन तांबे, महेंद्र काटकर, भावलाल सोमासे, शेख अखिल, उल्हास ठोंबरे यांच्यासह शहरातील सर्व थरातील मान्यवर यांनी उपस्थित राहून श्री छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. सायंकाळी पुतळा परिसरात डीजेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाची गाणी वाजवून  त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.