नांदेड जिल्ह्यात 380 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड दि. 2 :- बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 115 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 380 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 257 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 614 अहवालापैकी 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 7 हजार 407 एवढी झाली असून यातील 4 हजार 777 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 67.14 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 337 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 249 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

सोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील हिंगोली गेट नांदेड येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे तर मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी मगनपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर पोलीस कॉलनी नांदेड येथे 53 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल, नांदेड येथे तर बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी तरोडा नांदेड येथे 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कासराळी बिलोली येथील 60 वर्षाच्या एक पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 243 झाली आहे.

आज बरे झालेल्या 115 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 123 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 257 बाधित आढळले.जिल्ह्यात 2 हजार 337 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 52 हजार 54,घेतलेले स्वॅब- 49 हजार 936,निगेटिव्ह स्वॅब- 40 हजार 488,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 380,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 407,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-17,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,एकूण मृत्यू संख्या- 243,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 777,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 337,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 375, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 249.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *