वैजापुरात धम्मदेसना ग्रहण करण्यासाठी उपासकांची लक्षणीय गर्दी ; 30 हजार उपासकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

वैजापूर ,​२​ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- तथागत गौतम बुद्धांचा पवित्र अस्थिधातू कलश परभणी ते मुंबईला पायी घेऊन जाणा-या थायलंडच्या भिक्खू संघाची धम्म यात्रेचे बुधवारी (ता.01) येवला येथे प्रस्थान झाले. शहरात मंगळवारी धम्म पदयात्रेचे आगमन झाले यावेळी अभूतपूर्व जनसागर उसळला होता. बौद्ध उपासकांनी भिक्खू संघाच्या आगमन मार्गावर दीड किलोमीटर पर्यत रांगोळी आणि पुष्पाचा सडा टाकून जल्लोषात स्वागत केले.

17 जानेवारीपासून थायलंड सरकार आणि सिने अभिनेते गगन मलिक फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांची अस्थिधातू कलश पायी दर्शन धम्म यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत थायलंड येथील एकशे दहा भिक्खू संघाचा समावेश आहे.पायी पदयात्रेचे मंगळवारी शहरात आगमन झाले होते.आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेरखान, डॉ.राजीव डोंगरे, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, हेडगेवार बँकेचे चेअरमन प्रशांत कंगले, दशरथ बनकर, दिनेश राजपूत, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड , सीईओ भागवत बिघोत, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी,पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत आदीसह शहर व ग्रामीण भागातुन मोठया संख्येने बौद्ध उपासकांनी धम्म यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 

अस्थिधातू कलश दर्शनासाठी गर्दी

वैजापूर – गंगापूर मार्गावरुन तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थिधातू कलश घेऊन आगमन झालेल्या थायलंडचे भिक्खू संघाचे स्वागतासाठी दीड किलोमीटर पर्यत बौद्ध उपासक रस्त्यावर दुतर्फा बसून त्यांच्या चरणावर पुष्प अर्पण करुन स्वागत केले.जिल्हा परिषद मुलांची प्रशाला मैदानावर अस्थिधातू कलश दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.जवळपास 30 हजार उपासकांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केले.तसेच भिक्खू संघाच्या धम्मदेसना ग्रहण करण्यासाठी उपासकांची लक्षणीय गर्दी होती. 

शहरात विविध मार्गावर पदयात्रेचे स्वागत व अस्थिकलशाचे दर्शन 

तथागत भगवान गौतम बुद्ध-अस्थिधातू कलशाचे क्रांती जिम, डॉ.आंबेडकर पुतळा, पोस्ट ऑफिस, आंबेडकर नगर, नांदगाव या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करुन दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.शहरात धम्मयात्रा नियोजन समितीचे संयोजक मनीष दिवेकर, राजेंद्र बागुल, पत्रकार प्रशांत त्रिभुवन, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, मंगेश गायकवाड, दिगंबर मोरे, विलास पगारे, बाबासाहेब पगारे, अनिल आल्हाट, ए. टी. पगारे, मनीष गणवीर , अशोक तांबूस, विनोद साळवे, विलास त्रिभुवन,बाळासाहेब गायकवाड, ई. वाय.शिंदे, संजय पगारे, काशिनाथ बागुल, सिद्धार्थ भुईगळ, अण्णा पठारे, सुधीर बागुल, बाबासाहेब वाघ, संपत जाधव, राजवीर त्रिभुवन, राहुल त्रिभुवन यांनी धम्म यात्रा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.