अर्थसंकल्पाचा लाभ समाजातील सर्व घटकांना पोहोचणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अमृत काळातील पहिल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प एक समृद्ध आणि समावेशी भारताची परिकल्पना करतो, ज्यात सर्व समाजघटकांना विशेषतः युवक, महिला, शेतकरी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पोहोचणार असल्याचे म्हटले आहे.

देशाला स्वयंपूर्णतेच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ घडवून आणेल, आयात कमी करेल आणि भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेऊन आपले ऊर्जा क्षेत्राला बळकटी देणारा असल्याचे गडकरी म्हणाले.