देशव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत 220.17 कोटी लसमात्रा

कोविड -19 लसीकरणाची अद्ययावत माहिती

देशव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आत्तापर्यंत एकूण 220.17 कोटी लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. (त्यापैकी 95.14 कोटी लसमात्रा, या लसीकरणाचा दुसरा डोस म्हणून तर 22.45 कोटी खबरदारीची लसमात्रा म्हणून दिल्या गेल्या आहेत.)

गेल्या 24 तासात 23,490 लसमात्रा दिल्या गेल्या.

भारतातील सक्रिय रुग्णसंख्या 2,149 आहे.

सक्रिय रुग्णसंख्या 0.01% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 98.8% आहे.

गेल्या 24 तासात 182 रुग्ण बरे झाले त्यामुळे रुग्ण बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 4,41,48,165 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 104 नवे रुग्ण नोंदवले गेले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.07%।आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.10% आहे.

आतापर्यंत एकूण 91.32 कोटी चाचण्या केल्या आहेत. मागील 24 तासात 1,52,825 चाचण्या करण्यात आल्या.