‘टीईटी’संदर्भात चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,२८ डिसेंबर/ प्रतिनिधी :- शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले

याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सदस्य संजय कुटे यांनी उपस्थित केला होता यावर उत्तर देताना श्री. फडणवीस बोलत होते.या सभागृहातील अनेक मंत्र्यांनी टीईटीत भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे तसेच सरकार त्यांना पाठिशी घालत आहे व त्यांच्यावर कारवाई करत नाही या निषेधार्थ सर्व विरोधक सभात्याग करत असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयामधून मिळालेले २३ डिसेंबर २०२२ च्या पत्राद्वारे कळवण्यात आले की, माझा तारांकित प्रश्न सूचना क्र. 50419 राखून ठेवण्यात आलेला आहे. तो आजच्या दिवशी ठेवण्यात आलेला आहे.असे पत्र आले आहे. परंतु आजच्या कामकाजात तो दर्शवण्यात आलेला नाही. त्यामुळे पॉईंट ऑफ प्रोशिजर प्रमाणे विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे राखून ठेवलेला प्रश्न दुसऱ्या आठवड्यात त्याच दिवशी ठेवण्यात येतो, असे सांगत विरोधी पक्षनेते अजितदादा यांनी पॉईंट ऑफ प्रोशिजरनुसार सभागृहात राखून ठेवलेला प्रश्न उपस्थित केला.

त्या प्रश्नामध्ये सरकारमधील मंत्री संबंधित आहेत. टीईटीमध्ये संबंधित मंत्र्यांच्या मुली तेथे शिक्षक म्हणून रुजू झालेल्या आहेत. आम्हाला कोणाला जाणीव पूर्वक टार्गेट करायचे नाही. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग करत असेल आणि स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही, असे अजितदादा म्हणाले.