खंडाळा येथे जे.के.जाधव विकास मंच व ग्रामपंचायत खंडळातर्फे नेत्र शस्रक्रिया शिबीर ; 120 रुग्णांची तपासणी

वैजापूर,२७ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे जे.के.जाधव विकास मंच व ग्रामपंचायत खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने लायन्स क्लब जे.जे.प्लस हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या सहभागाने खंडाळा ग्रामपंचायत परिसरात सोमवारी (ता.26) मोफत नेत्र शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 120 डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली तर दहा रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यात आले.

बीपी,शुगरच्या 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली. जीवन विकास महाविद्यालयाचे अध्यक्ष जे. के. जाधव, सरपंच कौशल थोरात यांच्या हस्ते फीत कापून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी  नगराध्यक्ष साबेर खान, उपसरपंच हाजी मोहम्मद शेख, ग्राम विकास अधिकारी एम. बी. ढाकणे, विलास पवार, नंदू पवार, बाळासाहेब थोरात, काशिनाथ बागुल, साजिद खान, प्राध्यापक फकीरचंद गायकवाड, प्राध्यापक पी.के. साळुंखे, उत्तम भारतीय, एकनाथ झिंजुर्डे, योगेश पवार,  कैलास बागुल, राजेंद्र मगर, राहुल थोरात आदी उपस्थित होते.