सर्व जीवांचा संबंध विच्छेद होऊन जातो:स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

जग सम्बन्ध पथ नाव का, मेघ वायु संयोग । 

जहॅं के तह सब चल भये,अन्त में होय वियोग ।।१४।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/१४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद  :

जगतातील सर्व संबंध नाव आणि यात्रेकरू समान आहेत. ज्याप्रमाणे नावेत बसलेले यात्री किनाऱ्यावर उतरताच आपापल्या गन्तव्य स्थानी निघून जातात, त्यांचा त्या नदीशी, नावेशी आणि त्यातील यात्रेकरूंशी काहीही संबंध राहात नाही, किंवा जसे वाऱ्यामुळे ढग छिन्न-भिन्न होऊन जातात तद्वतच सर्व जीव कर्मवश एका ठीकाणी एकत्र येतात आणि कर्मवश फल प्राप्त करून इतरत्र निघून जातात. सर्व जीवांचा संबंध विच्छेद होऊन जातो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org