पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद,वाचा त्यांच्याच शब्दांत …

नवी दिल्ली, 12 ऑगस्‍ट 2020

नमस्कार

तुम्हा सर्वांशी बोल्ल्यांनंतर प्रत्यक्ष वस्तुस्थितीची अधिक व्यापक माहिती मिळते आणि हे देखील समजते कि आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. असे नियमितपणे भेटणे, चर्चा करणे आवश्यक देखील आहे कारण जस-जसा  कोरोना महामारीचा काळ लोटत आहे, नवनवीन परिस्थिती देखील निर्माण होत आहेत.

रुग्णालयांवर दबाव, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव, दैनंदिन कामकाजात सातत्याचा अभाव, प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येतो. मला समाधान आहे कि प्रत्येक राज्य आपापल्या पातळीवर  महामारी विरोधात लढाई लढत आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्‍य सरकार असो, आपण पाहतो आहोत कि आपण सातत्याने एक टीम बनून काम करत आहोत आणि याच संघभावनेमुळे आपण परिणाम दाखवण्यात यशस्वी झालो आहोत. एवढ्या मोठ्या संकटाचा ज्याप्रकारे आपण सामना केला आहे त्यामध्ये सर्वांची साथ मिळून काम करणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

सर्व माननीय मुख्‍यमंत्री, आज  80 टक्के सक्रिय रुग्ण, आज जे आपण भेटत आहोत या  10 राज्यांमध्ये आहेत. आणि म्हणूनच कोरोना विरोधात लढाईत या सर्व राज्यांची भूमिका खूप मोठी आहे. आज देशात 6 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत ज्यापैकी बहुतांश रुग्ण या दहा राज्यांमध्येच आहेत. म्हणूनच ही गरज भासली कि या दहा राज्यांबरोबर एकत्र बसून आपण आढावा घ्यावा, चर्चा करावी. आणि त्यांच्या ज्या सर्वोत्तम पद्धती आहेत, त्यांनी कशा प्रकारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत याची माहिती व्हावी. कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे आणि आजच्या या चर्चेमुळे आपल्याला एकमेकांच्या अनुभवातून बरेच काही शिकायला जाणून घ्यायला मिळाले. कुठे ना कुठे ही एक भावना आज समोर आली आहे कि जर आपण एकत्रितपणे आपल्या या दहा राज्यांमध्ये कोरोनावर मात केली तर देशही जिंकेल.

मित्रांनो, चाचण्यांची संख्या वाढून प्रतिदिन  7 लाखांवर पोहचली आहे आणि सातत्याने वाढतही आहे. यामुळे संसर्ग ओळखण्यात आणि रोखण्यात जी मदत मिळत आहे, आज आपण त्याचे परिणाम पाहत आहोत. आपल्याकडे सरासरी मृत्युदर याआधीही जगाच्या तुलनेत खूप कमी होता, आनंदाची बाब म्हणजे हा मृत्युदर सातत्याने कमी होत आहे. सक्रिय रूग्णाची टक्केवारी कमी होत आहे, रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत आहे, त्यात सुधारणा होत आहे. याचाच अर्थ हा आहे कि  आपले प्रयत्न प्रभावी सिद्ध होत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे कि यामुळे लोकांमध्ये देखील विश्वास वाढला आहे,  आत्मविश्वास वाढला आहे आणि भीतीचे वातावरण देखील थोडे कमी झाले आहे.

आणि जसजसे आपण चाचण्या वाढवत जाऊ, आपले हे यश पुढे आणखी मोठे होईल. आणि एक समाधानाची भावना आपल्याला जाणवेल. आपण  मृत्युदर 1 टक्क्याच्या खाली आणण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, ते देखील आपण जर थोडा प्रयत्न केला, अधिक भर देऊन आपण जर प्रयत्न केला तर ते उद्दिष्ट देखील आपण गाठू शकतो. आता पुढे आपल्याला काय करायचे आहे, कसे पुढे जायचे आहे, याबाबतही पुरेशी स्पष्टता आपल्यामध्ये निर्माण झाली आहे आणि एक प्रकारे तळागाळापर्यंत सर्वाना समजले आहे कि काय करायचे आहे, कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे. ही गोष्ट भारताच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण पोहचवू शकलो आहोत.

आता हे पहा, ज्या राज्यांमध्ये चाचण्यांचा दर कमी आहे आणि जिथे बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे तिथे चाचण्या वाढवण्याची गरज समोर आली आहे. विशेषतः बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यांमध्ये चाचण्या वाढवण्यावर विशेष भर देण्याची बाब आपल्या या संवादातून समोर आली आहे.

मित्रानो. आतापर्यंतचा आपला अनुभव आहे कि कोरोना विरोधात प्रतिबंध, संपर्क शोध आणि देखरेख ही सर्वात प्रभावी आयुधे आहेत. आता जनता देखील ही गोष्ट समजायला लागली आहे, लोक पूर्णपणे सहकार्य देखील करत आहेत. ही जागरूकता आपल्या चांगल्या प्रयत्नांच्या उत्तम परिणामांच्या दिशेने आपण पुढे जात आहोंत. गृह विलगीकरणाची व्यवस्था म्हणूनच आपण आज इतक्या उत्तम प्रकारे लागू  करू शकलो आहोत.

तज्ञांचे असे म्हणणे आहे कि जर आपण सुरुवातीच्या 72 तासातच बाधित रुग्णांची ओळख पटवली तर या संसर्गाचा वेग बऱ्याच प्रमाणात मंदावू शकतो. आणि म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहे कि हात धुणे असेल, दो गज की दूरी अर्थात सुरक्षित अंतर राखणे असेल, मास्‍क असेल, कुठेही न थुंकण्याचा कटाक्ष असेल, या सगळ्याबरोबरच आता सरकारांमध्ये आणि सरकारी व्यवस्थांमध्ये देखील आणि कोरोना योध्यांमध्ये आणि जनतेत देखील एक नवीन मंत्र आपल्यला व्यवस्थितपणे पोहचवायला लागेल आणि तो आहे  72 तासात ज्याला कुणाला लागण झाली असेल, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी व्हायला हवी, त्यांचा शोध घेतला जायला हवा, त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था व्हायला हवी. जर आपण या 72 तासांच्या सूत्रावर भर दिला तर तुम्ही लक्षात घ्या कि इतर गोष्टींबरोबरच आता या गोष्टीचा देखील समावेश करायचा आहे कि 72 तासांच्या आत ही सर्व कामे पूर्ण करायची आहेत.

आज चाचणीच्या नेटवर्क व्यतिरिक्त आरोग्य सेतु ऐप देखील आपल्याकडे आहे.  आरोग्य सेतुच्या मदतीने जर आपल्या एखाद्या टीमने  नियमितपणेयाचे विश्लेषण केले तर अतिशय सहजपणे कुठल्या भागातून तक्रार आली आहे तिथे आपण पोहोचू शकतो.  आपण पाहिले आहे  कि हरियाणाचे काही जिल्हे, उत्‍तर प्रदेशचे काही जिल्हे आणि दिल्‍ली, एक असा  कालखंड आला कि मोठा चिंतेचा विषय बनले. सरकार ने देखील दिल्‍लीत अशी  घोषणा केली  कि वाटले खूप मोठे संकट निर्माण होईल. तेव्हा मी एक आढावा बैठक घेतली आणि आपले गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बनवले आणि नव्याने सर्व व्यवस्था केली. त्या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये आणि शहरात दिल्लीत देखील आपण मोठ्या प्रमाणात आपल्याला हवा असलेला परिणाम साध्य करू शकलो.

मला वाटते कि कितीही कठीण परिस्थिती दिसत असली तरी योजनाबद्ध रीतीने पुढे मार्गक्रमण केले तर त्या गोष्टी आपण आठवडा-10 दिवसात आपल्या बाजूने वळवू शकतो. आणि आपण याचा अनुभव घेतला आहे. आणि या रणनीतीचे प्रमुख मुद्दे हेच होते कि प्रतिबंधित क्षेत्राला पूर्णपणे वेगळे ठेवणे, जिथे गरज असेल तिथे सूक्ष्म प्रतिबंधाचा आग्रह धरणे, शंभर टक्के तपासण्या करणे, रिक्शा-ऑटो चालक आणि घरांमध्ये  काम करणाऱ्या लोकांना देखील आणि अति-जोखीम असलेल्या लोकांची तपासणी पूर्ण व्हायला हवी. आज या प्रयत्नांचा परिणाम आपल्यासमोर आहे. रुग्णालयात उत्तम व्यवस्थापन, आयसीयू खाटांची संख्या वाढवणे त्यासारख्या प्रयत्नांची देखील मोठी मदत झाली आहे.

मित्रांनो, सर्वात जास्त तुम्हा सर्वांचा अनुभव आहे. तुमच्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीची निरंतर देखरेख करून जे परिणाम समोर आले त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत आहे. आज जेवढे आपण करू शकलो आहोत, त्यात तुमच्या सर्वांच्या अनुभवाची खूप मदत होत आहे. मला विश्वास आहे  कि तुमच्या या अनुभवांच्या सामर्थ्यामुळे देश ही लढाई पूर्णपणे जिंकेल आणि एक नवी सुरुवात होईल. तुमच्या आणखी काही सूचना असतील, काही सल्ला असेल तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध आहे. तुम्ही नक्की सांगा आणि मी तुम्हाला विश्वास देतो कि सरकारचे सर्व अधिकारी देखील उपलब्ध असतील.

ज्या-ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला आहे, ज्यासाठी चिंता व्यक्त केली आहे, आमची टीम त्वरित त्याबाबत पावले उचलेल, मात्र आपल्याला माहीतच आहे कि हा जो कालखंड असतो, श्रावण, भाद्रपद आणि दिवाळी पर्यंतचा, त्यावेळी काही आजार आणि रोगांचे वातावरण निर्माण होते ते देखील आपल्याला सांभाळायचे आहे. मात्र मला विश्वास आहे कि आपण मृत्युदर एक टक्क्याच्या खाली आणण्याचे, रुग्ण बरे होण्याचा दर वेगाने वाढवण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, 72  तासात संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची व्यवस्था करणे, या सर्व गोष्टींवर जर आपण अधिक लक्ष केंद्रीत केले तर आपली  जी 10 राज्‍य आहेत, जिथे  80 टक्के सक्रिय रुग्ण आहेत, आपली 10 राज्‍य, जिथे 82 टक्के मृत्‍यु झाले आहेत, आपली ही  10 राज्‍य ही संपूर्ण स्थिती बदलवू शकतात. आपण 10 राज्‍य मिळून भारताला विजयी बनवू शकतो. आणि मला विश्वास आहे कि आपण हे काम करू शकू. मी पुन्हा एकदा, तुम्ही खूप सवड काढलीत, वेळेची मर्यादा असूनही अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वानी आपले म्हणणे मांडले .

मी तुम्हाला खूप-खूप  धन्‍यवाद देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *