वैज्ञानिक साधनेद्वारे जीवन काळातच ईश्वर साक्षात्कार करणे हाच  सर्व मानव मात्राचा धर्म

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

सद्गुरु शरणहिं उबरै, होय स्वतन्त्र भवधार । 

माया दुस्तर तरन है, जासों विधि हरि हार ।।०२।। 

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/०२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सद्गुरूंना शरण गेल्याने मानवाचा उद्धार होतो. स्वतंत्र, मनमुखी व्यक्ती प्रकृती-प्रवाहात (भवधारेत) वहावत जातो. प्रकृतीला, मायेला पार करणे अती कठीण आहे. मायेच्या पाशात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही अडकून पराजित झाले आहेत, तिथे साधारण व्यक्ती बद्दल काय बोलावे ?  म्हणून या संसार सागरातून पार होण्यासाठी दीन-अधीन बनून सद्गुरू शरणागत होऊन ब्रह्मविद्येच्या वैज्ञानिक साधनेद्वारे जीवन काळातच ईश्वर साक्षात्कार करणे हाच  सर्व मानव मात्राचा धर्म आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org