केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू

केदारनाथ :- केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्पवरून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केले आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दिली. सदर हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. केदारनाथमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुकं असल्याने या भागातील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत  झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“उत्तराखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे दुःख झाले. या दु:खद प्रसंगी, शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या शोक संवेदना : पंतप्रधान @narendramodi”