युवक महोत्सवातील शृंगारिक लावणीच्या अदाकारीने प्रेक्षक घायाळ

 नांदेड ,१० ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- ‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात स्पर्धक लावण्यवतीने शृंगारिक लावणीच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी लोकशाहीर वामनदादा कर्डक कला मंचावर लावणी या कलाप्रकाराला प्रेषकांची टाळ्यांची अनं शिट्यांची मोठी दाद मिळाली.

‘गेला गर्दीत मारून धक्का’ ही सांघिक लावणी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कल्याणी कुलकर्णी, दिव्या सूर्यवंशी, श्रुती गीते, अश्विनी खिल्लारे यांनी सादर केली. तर ‘या रावजी बसा भावजी’ ही  लावणी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या  तेजस्विनी शिंदे हिने ठसकेबाज सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

‘विचार काय तुमचा डोळे राखून असं का बघता’ ही शृंगारिक लावणी नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या पूजा वाघमारे हिने अप्रतिम सादर केली. महिला महाविद्यालय नांदेडची स्पर्धक वैष्णवी दुधडे हिने असे ‘वाजवा की रात्र गाजवा की’ ही बहारदार लावणी सादर केली. 

‘गेला गर्दीत मारून धक्का’ ही सांघिक लावणी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कु.कल्याणी कुलकर्णी, दिव्या सूर्यवंशी, श्रुती गीते, अश्विनी खिल्लारे यांनी सादर केली. तर ‘या रावजी बसा भावजी’ ही  लावणी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या  तेजस्विनी शिंदे हिने ठसकेबाज सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.