प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापरास मनाई

नांदेड दि. 12:- भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ता‍क दिन व अन्य राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिकडच्या काळात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्याने हा एक प्रकारे ध्वज संहितेचा अवमान आहे. राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास प्रतिबंध असून नागरिकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे गृह विभागाने परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन केले आहे.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरुन ते रस्त्यावर इतरत्र पडल्याने तो राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्रत्येक नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान हा राखला जाणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रध्वज संहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठी कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर कोणीही करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर हा करायचा झालाच तर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व स्तरावर याबाबत जनजागृती केली जात असून त्यात पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., ममहानगरपालिका आयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी / माध्यधमिक/ प्राथमिक आदि कार्यालयांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *