जालना जिल्ह्यात 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

61 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 11 :- जालना शहरातील एकुण 61 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.एकुण 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 30 अशा एकुण 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 8566 असुन सध्या रुग्णालयात -469 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3198, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-431,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-19167 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 99 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3014 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-15632, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 431, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2587.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील काद्राबाद परिसरातील रहिवासी असलेल्या 74 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1042 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-34140 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 101 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 89 नागरीकांकडून 15 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 827 नागरिकांकडुन 8 लाख 19 हजार 560 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *