नांदेडमध्ये 162 बाधितांची भर तर गत पाच दिवसात सहा जणाचा मृत्यू

नांदेड दि. 11 :- मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 130 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 162 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 118 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 516 अहवालापैकी 1 हजार 322 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 518 एवढी झाली असून यातील 1 हजार 909 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 115 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.6 ऑगस्ट रोजी उमरी तालुक्यातील काबलगुडा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, 9 ऑगस्ट रोजी करडखेड ता. देगलूर येथील 70 वर्षाची एक महिला , 10 ऑगस्ट रोजी दिपनगर तरोडा नाका येथील 76 वर्षाचा एक पुरुष, खुसरोनगर नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष व 11 ऑगस्ट रोजी हिमायतनगर येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर किल्ला रोड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 126 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 130 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन एकुण 44 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 46, भोकर 1, मुदखेड तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 5, बिलोली तालुक्यात 10, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 36, नायगाव 5, किनवट 5 असे एकूण 118 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 61,घेतलेले स्वॅब- 22 हजार 850,निगेटिव्ह स्वॅब- 17 हजार 552,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 162,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 518,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 25,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 25,मृत्यू संख्या- 126,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 909,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 465,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 297, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 115.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *