ठाकरेंना धक्का -बाळासाहेबांच्या ‘सावली’चा उद्धव ठाकरेंना रामराम!चंपासिंह थापा यांचा एकनाथ शिंदेंना पाठींबा!

ठाणे ,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा यांनी ऐन नवरात्रीच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा दर्शविला आहे. टेंभीनाका येथील जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या दुर्गेश्वरी मातेच्या आगमन सोहळ्यादरम्यान उद्धव ठाकरेंना रामराम ठोकत थापा यांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी मातोश्रीवर दीर्घकाळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.

May be an image of 3 people and people standing

एकीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार, हा वाद सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला, पण यानंतर चंपासिंह थापा यांनी घेतलेल्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंना चांगलाच दणका बसला आहे. “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे, अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत.”, अशी प्रतिक्रिया थापा यांनी दिली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ठिकठिकाणी फिरून शिवसैनिकांना जोडण्यासाठी निष्ठायात्रा घेत आहेत. मात्र ठाकरे परिवाराशी संबंधित बाळासाहेबांच्या अदगी जवळच्या व्यक्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.