गुलाम नबी आझाद यांच्या नव्या पक्षाचे नाव “डेमोक्रेटिक आझाद पार्टी”

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नावं आहे. मागच्याच महिन्यात आझाद यांनी कॉंग्रेसला सोड चिट्ठी देऊन आपण नवीन पक्ष स्थापन करू असे संकेत दिले होते.

Image


 धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाच्या विचारांचा पाया असेल व जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे,स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करणे हा आपल्या पक्षाचा अजेंडा असेल असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आझाद यांनी कॉंग्रेसमधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 १९७३ मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणाला सुरुवात केली. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने आजाद यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. १९८२ मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.