गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी आंदोलन केले होते.

मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधून थेट आझाद मैदानात त्यांची भेट घेतली. त्यांचे निवेदन स्वीकारले. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा विचार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत जे.जे. कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार करत असल्याचे आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आज जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजीव मिश्रा यांनी श्री. मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.सिंहगड किल्ल्याच्या सुशोभीकरणात जे.जे. कला महाविद्यालयाचा सहभाग घेण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच कांदळवनांच्या कुंपणभींतींचे सुशोभीकरणही जे.जे. कला महाविद्यालयाने करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांत जे.जे. कला महाविद्यालयाचा कसा सहभाग असू शकतो यासंदर्भातही यावेळी चर्चा केली.