शिर्डीत दहशतवादी सापडला

महाराष्ट्र आणि पंजाब एटीएसची मोठी कारवाई

शिर्डी : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पंजाबमधील राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीत अटक केली आहे.

१६ ऑगस्टला पंजाबमध्ये पोलिस दलातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीला आयईडी लावून ती उडवण्याचा कट त्याने आखला होता, असा आरोप आहे.

पंजाब एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसने एकत्र कारवाई करत राजेंदरला अटक केली आहे. आरोपीला पंजाब एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.