अशा धमक्यांना गांभिर्याने घ्या : अजित पवार

मुंबई : अशा प्रकारच्या धमक्यांना गांभिर्याने घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

अनेकदा अशा धमक्या येतात, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती, त्याच्या खोलात गेल्यानंतर ते माथेफीरू विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. धमकी ही गांभिर्याने घेतली पाहीजे. आपली पोलिस यंत्राणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्राने देखील यामध्ये लक्ष देऊन गांभिर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकार घेईल अशी अपेक्षा करुया, असे अजित पवार म्हणाले.