मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण

मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण

मुंबई:- स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या हस्ते  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च न्यायालय परिसरात न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 न्यायमूर्ती नितीन सांबरे, रोहित देव, मनीष पितळे, विनय जोशी, अविनाश घरोटे, अनिल किलोर, श्रीमती एम. एस. जवळकर, जी. ए. सानप, अनिल पानसरे,श्रीमती उर्मिला जोशी-फाळके, प्रशासन प्रबंधक आर. एम. सदराणी, न्यायिक प्रबंधक अमित जोशी, उप प्रबंधक (राजशिष्टाचार) के, एम. घारोटे, आणि व्ही. एस. पुंडलिक यांच्यासह उच्च न्यायालयातील सर्व प्रबंधक, वकील संघाचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.