वैजापूर शहर व तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा

वैजापूर,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव दिन शहर व तालुक्यात सोमवारी विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा करण्यात आला.


स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, भारत माता पूजन व प्रभात फेरी काढण्यात आली. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस अमृत हा अमृत महत्व शहरात राष्ट्रीय एकात्मता मिरवणूक, महिला मेळावा, मॅरेथॉन स्पर्धा असे विविध कार्यक्रम ही घेण्यात आले.

हर घर तिरंगा तीनही दिवस अत्यंत डौलाने फडकत होता. 15 ऑगस्ट दिनी पालिकेत नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल गायकवाड, हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सैनिक वसंतराव कुलकर्णी यांनी तर उपविभागीय कार्यालयात माणिक आहेर यांनी ध्वज फडकवला.

विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात कार्यालयप्रमुखांनी  या प्रसंगी आ. रमेश बोरनारे, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, विशाल संचेती, बाबासाहेब जगताप, मुख्याधिकारी भागवत  बिघोत,  विकास अधिकारी एच.आर.बोयनार. डॉ.व्ही.जी.शिंदे, रवींद्र आप्पा साखरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस श्रीमती कमलबाई लोंढे, श्रीमती भोसले, श्रीमती राजपूत, जीवन राजपूत, राम उचित, मोती हिवाळे, विनोद गायकवाड,  प्रा.विठ्ठलसिंह ढाकरे, दिनेश ढाकरे,  स्वच्छता निरीक्षक बिष्णू आलूले, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन यांच्यासह शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.