शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी अविनाश पाटील गलांडे तर शहरप्रमुखपदी प्रकाश चव्हाण यांची नियुक्ती

वैजापूर,१५ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांची तर शहरप्रमुखपदी नगरसेवक प्रकाश पाटील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. 

प्रकाश पाटील चव्हाण

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील जगताप व शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके हे दोघेही आ.रमेश पाटील बोरणारे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना पदावरून  दूर केले असून त्यांच्याजागी गलांडे व चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.