शिवसेना,जे.के जाधव मित्रमंडळ व तुलसी आय हॉस्पिटलच्या वतीने नेत्र चिकित्सा शिबिराला वैजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- शिवसेना, जे.के.जाधव मित्रमंडळ व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराला शनिवारी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Displaying IMG-20220305-WA0084.jpg

शहरातील जामा मस्जिद परिसरात आयोजित या शिबिराचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरनारे यांच्याहस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष साबेरखान होते. राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के.जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, नगरसेवक प्रकाश चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष काझी मलिक, तुलसी हॉस्पिटल नाशिकचे डॉ. शेखर सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून सतत सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिलासा देण्याचे मौलिक कार्य करीत असल्याचे प्रतिपादन आ.रमेश पाटील बोरणारे यांनी यावेळी बोलतांना केले तर उपक्रमाचे मार्गदर्शक माजी उद्योग संचालक जे.के जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शिबिराचा हेतू विषद करून  सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेच्या मदतीने आपल्या गाव शिवारातील नागरिकांची सेवा करण्याची भूमिका होती घेतल्याचे ते म्हणाले. तुलसी नेत्र रुग्णालय नाशिकचे डॉ. शेखर सोनवणे, नितेश शिबेकर, दीपक निकाळे आदींनी जवळपास दोनशे नागरिकांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा केली. शिबीर यशस्वीतेसाठी जे.के.महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू भिंगारदेव, उपप्राचार्य सुनील कोतकर, प्रा.पंकज साळुंके,प्रा.राजू केदार, मुख्याध्यापक कैलास डोंगरे, उपजिल्हा रुग्णालयाचे श्याम उचित, प्रिन्सिपॉल भुजाडे, सहशिक्षक मंगेश भागवत यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक डॉ.निलेश भाटिया, सखाहरी बर्डे, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी, हरिष पालेजा,राजू काझी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख खलील मिस्तरी, शाखाप्रमुख आवेज खान, मोहनराव साळुंके, भगवान व्यवहारे आदी उपस्थित होते.