बालकांच्या आधार नोंदणीची कार्यवाही जलद गतीने करा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद ,२७ मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 41 लक्ष 61 हजार 813 आधार नोंदणी पूर्ण झाली. तरीही वय वर्ष पाचपर्यंतच्या बालकांचे आधार नोंदणीची कार्यवाही तत्काळ करावी. आधार केंद्राच्या पहाणी दरम्यान केंद्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश देखील सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सबंधितांना दिल्या. तसेच आधार केंद्राची पाहणी करण्याचे आदेश प्रकल्प व्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान विभागास देण्यात आले आहेत. पाहणी दरम्यान केंद्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

                    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आधार अद्यावतीकरणासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे उपमहासंचालक सुमनेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, योगेश निकम, आधार नोडल अधिकारी, आयटी सेलचे प्रकल्प व्यवस्थापक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

                    आधार सेवा केंद्रावर नवीन आधार आणि अनिवार्य बायोमेट्रिक दुरूस्ती मोफत, मोबाईल क्रमांक दुरूस्ती रूपये 50, पत्ता दुरूस्ती 50, बायोमेट्रिक दुरूस्ती 100 रूपये, फोटो दुरूस्ती 100 रूपये असणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.