कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ५६ हजार गुन्हे दाखल; २९ हजार व्यक्तींना अटक

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. ९ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ५६ हजार ९८४ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच २९ हजार ७९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६९ हजार ४०० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ८ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३०० (८६३ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०६ हजार १०५

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८८ हजार ७८६.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ७१

(मुंबईतील ४२ पोलीस व २ अधिकारी असे एकूण ४४, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ४, ,  ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, अमरावती शहर १,  उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी)

कोरोना बाधित पोलीस – १२६ पोलीस अधिकारी व १०२७ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *