आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यातही ओमायक्रॉनची पहिला रुग्ण आढळला

राज्यात कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ
उस्मानाबाद जिल्ह्यात 5 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण

मुंबई,९ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 44,388 नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. तर ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे. राज्यात एकाच दिवसात 207 नवे ओमायक्रॉनबाधित  रुग्ण आढळून आहे.

जालना शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असतानाच आज रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढलून आल्याने प्रशासना समोरील अडचणीत भर पडली आहे.

दुबई येथून जालन्यात १ जानेवारी रोजी परतलेल्या एका व्यक्तीचा लाळेचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. सदर अहवाल आज रविवारी ओमायक्राँन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

ओमायक्रॉनचा धोका आता वाढतच चालला आहे. राज्यात गेल्या २४ तासात २०७ रुग्ण आढळले आहे. धक्कादायक म्हणजे, सांगलीमध्ये सर्वाधिक ५७ रुग्ण आढळले आहे. तर मुंबईमध्ये ४० रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ पुणे २२, नागपूर २१, पिंपरी चिंचवड १५, ठाणे १२, कोल्हापूर ८ अमरावती ६, उस्मानाबाद ६ बुलडाणा आणि अकोल्यात प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहे. नंदूरबार, सातारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहे. तर औंरगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत सर्वाधिक ६०६ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले आहे. तर पुण्यात रुग्ण संख्या २२३ वर आहे. तर ४५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे  तब्बल 44 हजार रुग्ण आढळले!

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात  44,388 नवीन रुग्णाचे निदान झाले आहे.  तर  १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.०४ टक्के एवढा आहे.सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहे तर २६१४ व्यक्ती सस्ंथात्मक क्वारटाइनमध्ये आहे.राज्यात 24 तासांमध्ये 15 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.98 टक्के इतका झालाय. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात कोरोनामुळे 12 जण दगावले आहेत. यामुळे राज्याचा मृत्यू दर 2.04 टक्के इतका झाला आहे.   

मुंबईत आज दिवसभरात साडे 19 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 15 हजार 969 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर 1 हजार 240 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 20 हजार 318 नवे रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने आज काहीसे कमी रुग्ण आढळले आहेत.