कोरोनाची तिसरी लाट?आरोग्यमंत्र्यांनी दिले राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे.  अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. राज्यात दिवसभरात दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही एक हजारांपलिकडे गेला आहे.

मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1 हजार 377 नव्या कोरोना रुग्णआंची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईत 922 रुग्ण आढले होते, त्यानंतर सोमवारी 809 रुग्ण सापडले. आज यात आणखी मोठी वाढ झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात 338 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मुंबईत बरं झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के झाला आहे. रुग्ण दुपटीचा दरही घसरुन 841 दिवसांवर आला आहे. यामुळे मुंबई पालिका प्रशासनाची चिंता वाढली असून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.