सावधान! राज्यात ओमायक्रॉन डोकं वर काढतोय ,ओमायक्रॉनचे उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी येथे दोन रुग्ण

राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची मालिका सुरुच

रुग्ण सापडल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन

स्मानाबाद,१५ डिसेंबर /प्रतिनिधी:- जिल्हयामध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन रूग्ण बावी (ता.उस्मानाबाद) येथील आहेत.या गावात प्रतिबंधात्मका उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून स्वत:चा बचाव करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

नागपूर पाठोपाठ आता आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि आता आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाण्यात हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 65 वर्षांच्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली की नाही ते पाहण्यासाठी चाचणी करण्यात आली. पुण्यावरून रिपोर्ट आल्यानंतर ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
कोविड-19 च्या नवीन ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याचे दिसून येत आहे.त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोविड-19 च्या प्रादूर्भावामध्ये वाढ होऊ नये यासाठी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रभावीपणे पालन होणे आवश्यक आहे.त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी घाबरून न जाता कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,नियमितपणे मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे,असेही आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व जिल्हयातील शासकीय ,निमशासकीय कार्यालयामध्ये नो मास्क नो एन्ट्री तसेच नो व्हॅक्सीन नो एन्ट्री मोहिम राबविण्यात येत आहे.मास्क घातलेला असल्या शिवाय तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे