ब्रिटनमधून आलेल्या कोरोना विषाणूच्या बाधितांची संख्या 38

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

नवीन ब्रिटन व्हेरिएंट जीनोमसह एकूण 38 जण संक्रमित झाल्याचे आढळले आहे.

एनआयएमएचएएनएस, बंगळुरुमध्ये 10, हैदराबाद,सीसीएमबीमध्ये 3, एनआयव्ही,पुणेमध्ये 5, आयजीआयबी, दिल्लीमध्ये 11, एनसीडीसी, नवी दिल्लीत 8  आणि एनसीबीजी, कोलकाता मध्ये 1 रुग्ण आढळला आहे.

एनसीबीएस, InSTEM, बंगळूरू, सीडीएफडी हैदराबाद, आयएलएस भुवनेश्वर आणि एनसीसीएस पुणे यांना आतापर्यंत ब्रिटन म्युटंट विषाणू सापडलेला नाही.

No.Institute/LabUnderPersons detected with new COVID strain
1NCDC New DelhiMoHFW8
2IGIB New DelhiCSIR11
3NCBG Kalyani (Kolkata)DBT1
4NIV PuneICMR5
5CCMB Hyderabad CSIR3
6NIMHANS BengaluruMoHFW10
Total  38

जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, एनसीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बंगळूरू, एनआयएमएचएएनएस बंगळूरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली)  बाधित नमुन्यांची चाचणी घेण्यात येत आहे.

या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये अलगीकरणात स्वतंत्र खोलीत ठेवले आहे. या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना देखील विलगीकरणात ठेवले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि इतरांसाठी व्यापक संपर्क ट्रेसिंग सुरू केली आहे. इतर नमुन्यांवरील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सुरू आहे.

ही परिस्थिती सावधगिरीने हाताळली जात असून ही  देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे, चाचणी करणे आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठविण्याबाबत राज्यांना नियमित सल्ला देण्यात येत आहे.