डॉ.उल्हास उढाण यांनी आयुष्यभर विद्यार्थी हित जपले-श्रध्दांजली सभेत मान्यवरांमधून उमटला सूर

औरंगाबाद,१३ डिसेंबर /प्रतिनिधी:- मराठवाड्यातील शैक्षणिक चळवळीत सकि‘य काम करणारे डॉ.उल्हास उढाण यांनी आयुष्यभर विद्यार्थी हित जपले. यासाठी त्यांनी कधीही जात-पात-धर्म पाहिला नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा, ते सोडवणारा विद्यार्थी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. डॉ.उल्हास उढाण यांचे कार्य कायम लक्षात राहिल असा सूर आज विविध शैक्षणिक, विद्यार्थी, राजकीय संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून उमटला.

Displaying photo 02.jpg
देवगिरी महाविद्यालयातील शोकसभेत डॉ.उल्हास उढाण यांना श्रध्दांजली अपर्ण करताना मान्यवर. 

          डॉ.उल्हास उढाण यांचे 6 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या संदर्भात शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी देवगिरी महाविद्यालयात देवगिरी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, विविध प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक आदी संघटनेच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभेस प्रारंभ डॉ.उल्हास उढाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारंसघाचे आमदार सतीश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे, शहराध्यक्ष संजय केनेकर, व्दारकाभाऊ पाथ्रीकर, पंडित हर्षे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर, डॉ.राजेश करपे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.नरेंद्र काळे, डॉ.राम चव्हाण, डॉ.मच्छिंद्र गोल्डे, डॉ.अशोक तेजनकर, डॉ.गजानन सानप, डॉ.विक्रम खिल्लारे, प्रा.सुनील मगरे, डॉ.चेतना सोनकांबळे, योगिता तौर होके पाटील, डॉ.उमाकांत राठोड, नागराज गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, डॉ.योगेश पाटील, दिगंबर जाधव, प्रशांत इंगळे, लोकेश कांबळे, मयुर सोनवणे, अमोल दांडगे, नागेश गलांडे, ऍड.भगवान भोजने, तुकाराम सराफ, प्रा.रवी पाटील, श्याम सरकटे आदींनी यावेळी शोकसंवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मारोती तेगमपुरे यांनी केले. याप्रसंगी डॉ.उल्हास उढाण यांच्या आई रत्नमाला उढाण, मुलगी राजेश्वरी उढाण, मुलगा राजवर्धन उढाण आदींची उपस्थित होती.

मशिप्र मंडळ, राष्ट्रवादी पक्ष उढाण कुटुंबियांच्या पाठीशी- आ.सतीश चव्हाण

कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता डॉ.उल्हास उढाण यांनी शरद पवार यांच्या  विचारांवर निष्ठा ठेऊन राष्ट्रवादी पक्षात सकि‘य कार्य केले. विद्यार्थी चळवळीतून पुढे आल्यामुळे उल्हास उढाण यांना प्रश्नांची उत्तम जाण होती. उल्हासचा विद्यार्थी चळवळीचा वसा पुढे नेण्यासाठी असं‘य उल्हास उढाण घडले पाहिजे अशी अपेक्षा आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उल्हास उढाण यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल. त्यांचे कुटुंबिय सन्मानाने जगतील अशी व्यवस्था करण्यात येईल असे आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.