भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 128.76 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

  • गेल्या 24 तासात 79 लाख मात्रांचे लसीकरण
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%
  • गेल्या 24 तासात 6,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 558 दिवसातली सर्वात कमी संख्या
  • भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या 554 दिवसातील सर्वात कमी संख्या (95,014)
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.78%) गेले 23 दिवस 1% पेक्षा कमी

नवी दिल्ली,७ डिसेंबर/प्रतिनिधी:-

गेल्या 24 तासात 79,39,038 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 128.76 (1,28,76,10,590) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,1,34,23,668 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 10,004 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,40,79,612 झाली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.36% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 163 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.गेल्या 24 तासात 6,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 558 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 95,014 आहे, गेल्या 554 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.27% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,79,384 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.94 (64,94,47,014) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.78% असून गेल्या 23 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.63% असून गेले 64 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 99 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.