‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पीएच.डी कोर्सवर्क परीक्षा पुढे ढकलली

२२ व २३ डिसेंबर ऐवजी २९ व ३० डिसेंबर रोजी होणार 

नांदेड ,७ डिसेंबर/प्रतिनिधी:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्क हिवाळी २०२१ परीक्षेचे आयोजन यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे २२ व २३ डिसेंबर रोजी करण्यात आलेले होते. पण या दिवशी यूजीसी नेटची परीक्षा असल्यामुळे या परीक्षा आता २९ व ३० डिसेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 

पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहेत. लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील पीपल्स महाविद्यालय, परभणी येथील कमलताई जामकर महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये परभणी आणि हिंगोली येथील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

दि. २९ डिसेंबर रोजी स. ११ ते दु. २ दरम्यान रिसर्च मेथोडोलॉजी या विषयाची परीक्षा होणार आहे. ३० डिसेंबर रोजी स. ११ ते दु. १ दरम्यान कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयाची परीक्षा होणार आहे. तर त्याच दिवशी दुपारच्या सत्रात दु. २:३० ते ४:३० दरम्यान रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स या विषयाची परीक्षा होणार आहे. 

बदललेल्या परीक्षेबाबतची सुधारित माहिती व वेळापत्रक सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व संशोधक मार्गदर्शकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी केली आहे.