भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 110 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

  • गेल्या 24 तासात देण्यात आल्या देशभरात 57 लाखांहून अधिक मात्रा
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.25%
  • गेल्या 24 तासात 13,091 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • उपचाराधीन रुग्णांची संख्या (1,38,556), गेल्या 266 दिवसातली सर्वात कमी संख्या
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.18%) गेले 48 दिवस 2% पेक्षा कमी

नवी दिल्ली ,११ नोव्हेंबर/प्रतिनिधी:-गेल्या 24 तासात 57,54,817 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 110   (1,10,23,34,225) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,12,38,854 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

कोविड-19 अद्ययावत माहिती

देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक  लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 110.23 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 13,091  नवे रुग्ण आढळले. 

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.25%गेल्या मार्च 2020पासून सर्वोच्च स्तरावर

गेल्या 24 तासांत 13,878 रुग्ण कोविडमुक्त;  बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,38,00,925

देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1 %टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.40 %;  मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,38,556 गेल्या 266 दिवसांतील सर्वात कमी

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  (0.93%)  गेल्या 38 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर  (1.18%) गेल्या 48 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 61.99 कोटी चाचण्या करण्यात आल्या.