आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर,दिवाळीपूर्वीच मन्नतसमोर आतषबाजी

मुंबई ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- मुंबई उच्च न्यायालयाने आज शाहरूख खान याचा सुपूत्र आर्यन खान याला जामीन मंजूर केला आहे. गेल्या 25 दिवसांपासून त्याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. आधी एनसीबी कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. आता तर आर्यन खान याला कोठडीत पाठविणारे समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे.

 जामीनानंतर Aryan Khan ची पहिली प्रतिक्रिया !

ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. 

Mumbai Drugs Case: Aryan Khan to remain in jail; Bombay HC adjourns hearing  till Wednesday | As it happened

सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. 

आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर मन्नतवर देखील आतषबाजी करण्यात आली. आर्यनच्या फॅन्सने जामीनानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. तर इकडी उद्या किंवा परवा आर्यन जेलमधून बाहेर येणार आहे आणि घरी परतणार नाही. शाहरूखच्या चाहत्यांनी मन्नतसमोर फटाके फोडले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.