देशातल्या सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्ह्यातले,महाराष्ट्राच्या औरंगाबादसह 6 जिल्ह्यांचा समावेश 

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021:

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ नोंदवली जात आहे. एकूण नव्या रुग्णांपैकी 82.82% रुग्ण या दहा राज्यातील आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन 58,993 नवे रुग्ण आढळले आहेत. छत्तीसगडमधे 11,447 तर उत्तर प्रदेशात 9,587 नव्या रुग्णांची नोंद झाली.देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्यात आहेत.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 72.23% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यातले आहेत. देशातील एकून सक्रीय रुग्णांपैकी 51.23% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.भारतात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 10,46,631 वर पोहचली आहे. हे प्रमाण देशातील एकूण रुग्णांच्या प्रमाणात 7.93% आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रीय रुग्णांमधे 67,023 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली.

भारतात रोज नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात 1,45,384 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्ह्यांतआहेत.त्यात महाराष्ट्रातील मुंबई ,पुणे ,नागपूर ,ठाणे ,नाशिकआणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

भारतात आज 1,19,90,859 जण कोरोनामुक्त झाले. देशाचा कोरोनामुक्तीचा दर 90.80 % वर पोहचला आहे.गेल्या 24 तासात देशात 77,567 जण कोरोनामुक्त झाले.दैनंदिन मृत्यूसंख्येत वाढ होत असून गेल्या 24 तासात 794 मृत्यूची नोंद झाली.नवीन मृत्यूंपैकी 86.78% मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 301 तर छत्तीसगडमधे 91 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

देशभरात आजपर्यंत कोविड19 प्रतिबंधक लसीच्या 9.80 कोटी पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

उपलब्ध अहवालानुसार एकूण 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 लसीच्या मात्रा 14,75,410 सत्रांतून आज सकाळी सात वाजेपर्यंत देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत 89,88,373 आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर 54,79,821 आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीवर कार्यरत 98,67,330 कर्मचाऱ्यांना (पहिली मात्रा), तर आघाडीवर कार्यरत 46,59,035 कर्मचाऱ्यांना (दुसरी मात्रा) देण्यात आली, साठ वर्षांवरील 3,86,53,105 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 15,90,388 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तर, पंचेचाळीस ते साठ वर्षांमधील 2,82,55,044 लाभार्थ्यांना (पहिली मात्रा) आणि 5,82,064 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) देण्यात आली आहे.

HCWsFLWsAge Group 45-60 yearsOver 60 years Total
1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose
89,88,37354,79,82198,67,33046,59,0352,82,55,0445,82,0643,86,53,10515,90,3889,80,75,160

देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरणापैकी 60.62% लसीकरण आठ राज्यांमधे झाले आहे.गेल्या 24 तासात 34 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.लसीकरणाच्या 84 व्या दिवशी (9 एप्रिल, 2021), लसीच्या 34,15,055 मात्रा देण्यात आल्या. यापैकी 30,06,037 लाभार्थ्यांना 46,207 सत्रांमधे पहिली तर 4,09,018 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.जगभरात दररोज होत असलेल्या लसीकरणाचा विचार करता भारताने त्यात आपली आघाडी कायम ठेवली आहे.दिवसाला सरासरी 38,93,288 मात्रा देत भारत अव्वल स्थानी आहे