लोह्यात सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत; आर्थिक डबघाईची स्थिती

लोहा ,१३ एप्रिल/हरिहर धुतमल 

सतत होणारे लॉक डाऊन व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला दिवाळखोरीकडे नेणारे आहे..लोह्यात भरमसाठ दुकानांचा किराया ,नौकरांची पगार, वीजबिल, त्यातच सतत दुकानांवर निर्बंध . मग आम्ही जगावे तरी कसे…दररोजच खर्च दोन तीन हजार रुपयांचा असतो एवढे तूट भरून काढायची कशी या विवंचनेत सध्या छोटे मोठे व्यापारी असून लॉक डाऊन पेक्षा कडक नियम करून दुकाने उघडी ठेवावी अशीही मागणी या दुकानदारांनी केली आहे .

लोह्यात दुकानाचे वार्षिक भाडे अधिकचे असते.शिवाय त्या दुकानात काम करणारे नौकर, त्यांचा पगार, लाईट बिल ,किराया हे दुकान सुरू असो की बंद दैनंदिन खर्च त्या दुकान मालकांना द्यावाच लागणार आहे. अशातच कोरोना मुळे दुकानावर निर्बंध आहे ..जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता इतर बंद त्यातही काहीजण दुकाने उघडून माल विक्री करतात तर काही दुकानदार नियमांचे पालन करतात असा विरोधाभास पहावयास मिळतो  गेल्या वर्षभरात लोह्यातील बाजारपेठ त्रस्त झाली आहे.दिवाळीला किरायात वाढ झाली नाही पण जवळपास सहा महिने कोरोनाचा गेले.दिवाळी नंतर बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच गेल्या महिन्या पासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला .शहरात आधी पाच दिवसांचा सार्वजनिक लॉक डाऊन पाळण्यात आला त्यानंतर जिल्ह्यात दहा दिवसांच्या जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन जाहीर केला त्यामुळे बाजारपेठ पंधरा दिवस बंद राहिली त्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग व मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आणखी कडक निर्बध लागू केले त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला.

लोह्यात व्यापारी प्रमुख दिनेश तेललवार, कांता बिडवई , किराणा, कापड, फारशी, स्टेशनरी, छोटे व्यापारी असा सर्व व्यापाऱ्यांरी आपली कैफियत मुख्याधिकारी श्री पेंटे यांच्याकडे मांडली.. आमच्या व्यवहार कसा आर्थिक संकटात सापडला आहे याचे सोदाहरण देण्यात आले.शिवाय जे दुकानदार नजर चुकवून माल विक्री करीत आहेत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही नाही तर दुसरीकडे लॉक डाऊन चे तंतोतंत पालन करणाऱ्या दुकानदारावर कार्यवाहीची बडगा उगारला जात आहे असा वेगवेगळ्या मुद्यावर व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडली..   वर्षभरात व्यापाऱ्यांनाचे बहाल सुरू आहेत.धंद्याचे दिवाळे निघत  आहेत..अनेक छोटे मोठे व्यापारी दुकाने बंद करून रस्त्यावर आली आहेत एवढी आर्थिक दिवाळखोरी या कोरोना काळात झाली आहे बँक कर्ज देईना ..आणि सरकार  कोरोना वाढलाम्हणून दुकाने खोलु देईना असा अडचणीत व्यापार सापडला आहे.

आर्थिक मदत करा- दिनेश तेललवार

छोटे मोठे व्यापारी जे की या लॉक डाऊन मध्ये आर्थिक विवंचनेत सापडले आहेत सर्व व्यवसाय उध्वस्त होतो की काय अशी गेल्या वर्षभरा पासून स्थिती उदभवली आहे त्यामुळे सरकारने बिनव्याजी व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे व डबघाईला गेलेल्या दुकानदारांना सहकार्य करावे अशी मागणी आर्य वैश्य समाजाचे तालुकाध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, कापड असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत  बिडवई यांनी केले आहे