नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवेल – धर्मेंद्र प्रधान

Image

नवी दिल्ली,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 17 प्राध्यापकांना (एआयसीटीई) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद- विश्वेश्वरय्या सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तर व्यवस्थापन शिक्षण विद्याशाखेच्या 3 प्राध्यापकांना (एआयसीटीई) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद- डॉ. प्रीतम सिंह  सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आज विजेत्यांना  छत्र विश्वकर्मा पुरस्कार,  स्वच्छ आणि अद्यावत परिसर  पुरस्कार, 2020 प्रदान केला.

Image

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत असताना, नागरिकांमध्ये भारताला घडवण्याची इच्छाशक्ती आहे. ते म्हणाले की,  नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण भारतातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोन- 2047 नुसार आगामी 25 वर्षांसाठी मार्ग तयार करेल, अशी अपेक्षा आहे. शिक्षण आपल्या प्रत्येकाला अधिक जबाबदार आणि जागतिक नागरिक बनवेल. या 4 पुरस्कारांची सुरुवात केल्याबद्दल मंत्र्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अभिनंदन केले. शिक्षकांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याबरोबरच या पुरस्कारांनी नवोन्मेषाची प्रेरणा दिली आहे, असेही ते म्हणाले.

Image

गुणवंत विद्याशाखांचा सन्मान करणे आणि त्यांना जागतिक स्तरावर उच्च शिक्षणाच्या सतत बदलत्या गरजांबाबत स्वतःला अद्ययावत करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि  त्याद्वारे ज्ञानाच्या क्षेत्रात  प्रभावी योगदान देणे हे एआयसीटीई -विश्वेश्वरय्या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे, असे प्रधान यांनी सांगितले. डॉ. प्रीतम सिंह सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार या वर्षीपासूनच सुरु करण्यात आला आणि व्यवस्थापन शिक्षण विद्याशाखेतील उत्कृष्ट अध्यापन आणि संस्थात्मक नेतृत्व यासाठीच्या कामगिरीबद्दल प्राध्यापकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते असे ते म्हणाले.

प्रधान यांनी अधोरेखित केले की, छात्र विश्वकर्मा पुरस्कार,नाविन्यपूर्ण आणि कमी खर्चाचे उपाय उपलब्ध करून देण्याच्या  उद्देशाने आपल्या  विद्यार्थ्यांना सामाजिक आव्हानांकडे पाहण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. ” कोविड पश्चात भारताची आर्थिक पुनर्प्राप्ती: ”आत्मनिर्भर  भारत”ला पाठबळ देण्यासाठी उलट स्थलांतर आणि पुनर्वसन योजना या संकल्पनेतून परिषदेने यावर्षी पुन्हा विश्वकर्मा पुरस्कार 2020 ची घोषणा केली.