ऑलिम्पियन दर्जाचे स्टार खेळाडू तयार करु या -क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर 

यांनी बेंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) नेताजी सुभाष दक्षिण केंद्राला  भेट दिली आणि एनआयएस अर्थात नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या क्रीडा  प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या 58 व्या तुकडीच्या शिक्षक दिन सोहळ्यात 

सहभाग घेतला.

केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रावर नव्याने लक्ष केंद्रित केल्याचा पुनरूच्चार करत, नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय 

खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे याला बळकटी मिळाली आहे, केंद्रीय क्रीडा मंत्री या 

कार्यक्रमात प्रशिक्षक आणि खेळाडूंना संबोधित करताना म्हणाले की, “भारताच्या क्रीडा क्षेत्राचे  भविष्य प्रशिक्षकांच्या हातात आहे; शिक्षक दिनाच्या निमित्ताने, 

खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याचा आणि निष्णात करण्याचा 

संकल्प करूया आणि ते ऑलिम्पियन दर्जाचे स्टार खेळाडू म्हणून पुढे येतील हे सुनिश्चित 

करूया.”

तत्पूर्वी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बेंगळुरूच्या प्रशासकीय कक्षामध्ये नेताजी 

सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर  मंत्र्यांच्या दौऱ्याची सुरुवात 

झाली. 

मंत्र्यानी युवा खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर आणि या खेळाडूंना  जागतिक स्तरावर अव्वल कामगिरी करण्याच्या दृष्टीने  प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहन देत या कार्यक्रमाची सांगता झाली.