हत्ती संवर्धनासाठी सर्वात आधी स्थानिक समूहांचा सहभाग, या प्रकारे खालून वर असा दृष्टीकोन असणे आवश्यक : भुपेंद्र यादव

Image

हत्ती संवर्धन म्हणजेच पर्यावरण संवर्धन :  अश्विनि कुमार चौबे

नवी दिल्ली ,१२ऑगस्ट /प्रतिनिधी :- संपूर्ण भारतभरातील हत्ती आणि वाघांच्या गणनेसाठी 2022 मध्ये केल्या जाणार असलेल्या प्राणीसंख्या गणना प्रमाणासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेदरम्यान पाळावयाच्या प्राणीसंख्या गणना प्रमाण नियमावलीचे आज पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भुपेंद्र यादव यांनी अनावरण केले. पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे (MoEFCC) हत्ती आणि वाघांच्या गणनेचा एकत्रित अंदाज मिळवण्याचे प्रयत्न प्रथमच केले जात आहेत. या संबधीची नियमावली आजच्या जागतिक हत्ती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आली.

IMG-3218.JPG

या प्रसंगी बोलताना केंद्रीय वनमंत्र्यांनी हत्तींच्या संरक्षणासाठी प्रथम स्थानिक आणि त्या प्रदेशातील लोकांचा सहभाग असण्यावर भर दिला, तसेच या कामासाठी खालून वर सुरवात पद्धत अवलंबण्याचे महत्व सांगितले. त्यामुळे हत्ती-माणूस संघर्ष कमी होण्यास मदत होईल असेही त्याने नमूद केले.

राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी यावेळी समारंभाला संबोधित केले. हत्तींचे संरक्षण म्हणजे वनांचे संरक्षण आणि वनाचे संरक्षण हे पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यामुळे सर्व विशेषतः युवा वर्गाला यादृष्टीने प्रोत्साहन देऊन भारतीय  परंपरेत असलेल्या निसर्ग-मानव सुसंवादी जीवनाची ओळख पुढे नेता येईल.

या मंत्रालयाच्या हत्तींशी संबधित विभागाकडून प्रकाशित होत असणाऱ्या ‘ट्रंपेट’ या त्रैमासिकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. देशभरात विविध राज्यांमध्ये राज्य सरकारच्या वनविभागाकडून तसेच विविध संस्थांकडून हत्ती संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकण्यासाठी ट्रंपेट हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते.

IMG-3214.JPG

जागतिक हत्ती दिवस 2021 चे औचित्य साधत वनमंत्रालयाने WII, NMNH, WWF-India  व WTI  यासारख्या संस्थांच्या सहकार्याने आजादी का अमृतमहोत्सवाशी संबंधित असणाऱ्या सप्ताहाभराच्या कार्यक्रमाच्या आयोजनात भाग घेतल्याची घोषणाही हत्ती दिन-2021 चे औचित्य साधून करण्यात आली.

IMG-3220.JPG

भारत वगळता, हत्ती आढळत असलेल्या अन्य देशांत आता हत्तींची शिकार वा रहिवासाची ठिकाणे लुप्त होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. म्हणूनच धोक्यात असलेल्या प्रजातींच्या IUCN यादीत आशियाई हत्तींचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या गणना अंदाजानुसार जगात आता फक्त 50,000 -60000 हत्ती आहेत. यापैकी 60 टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आहेत.

CMS 13, गांधीनगर, गुजरात येथे फेब्रुवारी 2020 रोजी भरलेल्या स्थलांतरीत प्रजातीसंबधी अधिवेशनात भारतीय हत्तींचे नाव परिशिष्ठ-1 मध्ये टाकण्यात आले आहे.

जागतिक हत्ती दिवस हा हत्तीची बेकायदा शिकार, हस्तिदंताची तस्करी यांना रोखण्यासाठी योग्य धोरण   आखणे या मार्गाने हत्तींच्या संवर्धनासंबंधित बाबींकडे संबधितांचे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो.

यावर्षी नवी दिल्लीतील इंदिरा पर्यावरण भवन येथे हत्ती दिन साजरा होत आहे.