विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

श्री.वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी श्री. जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.

फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी 

विधानसभा सदस्य श्री.नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

श्री. वळसे-पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग हे प्रकरण गंभीर असून याबाबत सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करुन याबाबतचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असे नमूद केले.