भारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 35 कोटींचा टप्पा

आतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.21 कोटी लसी

नवी दिल्ली,३जुलै /प्रतिनिधी:-आज संध्याकाळी सात वाजता आलेल्या तापुरत्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने,  35 कोटी (35,05,42,004) मात्रांचा टप्पा ओलांडला. 21 जूनपासून सुरु झालेल्या सार्वत्रिक लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात, आज 57.36 लाखांपेक्षा अधिक (57,36,924)  लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

वर्ष 18 ते 44 या वयोगटातील 28,33,691 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 3,29,889 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून, 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण 99,434,862 हजार व्यक्तींना आतापर्यंत लसींच्या पहिली  मात्रा देण्यात आली असून 2,712,794 लाख लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 50 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, आंध्रप्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 18 ते 44 या वयोगटातील 10 लाख लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 34.46 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 44,111 नवे रुग्ण आढळले

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या, गेल्या 97 दिवसांनंतर 5 लाखांपेक्षा कमी झाली असून ती 4,95,533 इतकी झाली

सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.62% इतके आहे.

आतापर्यंत देशात एकूण 2,96,05,779 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासांत 57,477 रुग्ण कोविडमुक्त झाले

दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग 51 व्या दिवशी अधिक

रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 97.06% पर्यंत वाढले

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.35% इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर 2.35% वर आला असून सलग 26 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा खाली आहे

चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 41.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या