गेल्या 24 तासांत लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण,राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

नवी दिल्ली/मुंबई 7 एप्रिल 2021

देशभरात दिल्या जात असलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 8.70 कोटीच्या पुढे गेली आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 13,32,130 सत्रांद्वारे एकूण 8,70,77,474 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.गेल्या 24 तासांत 1,15,736 नवे रुग्ण आढळले आहेत.

लक्षणीय कामगिरीची नोंद करत भारताने दररोज सरासरी 30,93,861 लसीच्या मात्रा देऊन जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनताना अमेरिकेला मागे टाकले आहे.भारताच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 1,15,736 नवे रुग्ण आढळले आहेत.

राज्यात आज कोरोनाचे 59,907 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 30,296 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.७९% वर पोहोचला आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण 26,13,627 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.३६% एवढे झाले आहे. राज्यात सध्या 5,01,559 सक्रिय रुग्ण आहेत. 

सध्या राज्यात 25,78,530 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21,212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.70 टक्के रुग्ण या 8 राज्यांमधील आहेत.महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 55,469 रुग्ण आढळले. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 9,921 तर कर्नाटकमध्ये 6,150 नवे रुग्ण आढळले.भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 8,43,473. वर पोहोचली आहे. ती आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.59 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 55,250 रुग्णांची वाढ झाली आहे.देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 56.17 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत .

दैनंदिन नवीन रुग्णसंख्या वाढत असलेल्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या सरकारांबरोबर केंद्र सरकार सक्रियपणे काम करत आहे. देशातील कोविड 19 महामारी आणि लसीकरण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 4 एप्रिल 2021 रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल कोविड -19 परिस्थिती आणि दैनंदिन नवे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढत असलेल्या 11 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबाबत एक उच्च स्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (2 एप्रिल 2021) सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि आरोग्य सचिवांसमवेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली , ज्यामध्ये गेल्या दोन आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्ये मोठी वाढ नोंदविणाऱ्या 11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले गेले.

देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,17,92,135 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 92.11 % आहे.गेल्या 24 तासात 59,856 रुग्ण बरे झालेगेल्या 24 तासांत 630 मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 297 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुढीलप्रमाणे आहे.

“जनतेला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार आयुष्मान भारत आणि पंतप्रधान जनऔषधी योजनेसह अनेक उपाययोजना करत आहे. कोविड-19 विरूद्ध लढा बळकट करण्यासाठी भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. जागतिक आरोग्य दिनी आपण मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि इतर नियमांचे पालन करण्याबरोबरच शक्य ती सर्व काळजी घेऊन कोविड -19 शी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित करूया. त्याच वेळी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्व संभाव्य उपाय करा. जागतिक आरोग्य दिन हा आपली वसुंधरा निरोगी ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या सर्वांप्रति कृतज्ञता व प्रशंसा व्यक्त करण्याचा दिवस आहे. आरोग्य सेवेतील संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला पाठबळ देण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्याचा देखील हा दिवस आहे.”