औरंगाबाद जिल्ह्यात 1001 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 110 रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 31665 कोरोनामुक्त, 2776 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 12 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 435 जणांना (मनपा 366, ग्रामीण 69) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 31665 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 110 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35442 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1001 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 45 आणि ग्रामीण भागात 18 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (35)

साई रेसीडेन्सी, मंजीत नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), आंबेडकर नगर,सिडको  (1), एन अकरा, नवजीवन कॉलनी (2), हर्सूल परिसर  (1), होनाजी नगर (2), पद्मपुरा (4), अन्य (2), एन अकरा टी.व्ही सेंटर (1), कांचनवाडी (1), प्रतापगड नगर , सिडको (1), हडको, परिसर (1), गारखेडा परिसर (2),बाबा पेट्रोलपंप  परिसर (1), स्नेह नगर (1), एन दहा (1), पन्नालाल नगर (1), मोतीवाला नगर  (1),  बेगमपूरा  (4), जटवाडा  (1),  अभुषण पार्क , देवळाई रोड (1),  जवाहर नगर कॉलनी  (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर  (2),  देशमुख नगर  (1)

ग्रामीण (30)

चिंचोली  खुलताबाद  (1),  टिळक नगर , सिल्लोड (1), पिरबावडा, फुलंब्री (1), बजाज नगर (6), जामगाव गंगापूर (1), समता नगर ,गंगापूर (1),  श्रीकृष्ण नगर  (1),  फुलंब्री (2), कन्नड (10), खुलताबाद (1), सिल्लोड (1), वैजापूर (1), पैठण (3)

 दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत मुकुंदवाडीतील संतोषी माता नगरामधील 45 वर्षीय पुरूष आणि कांचन नगरातील 68 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.